सुरक्षा दलांची कामगिरी मोलाची: लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

हैदराबाद: काश्‍मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले अत्यंत मोलाचे काम करत असल्याची पावती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज दिली.

ते येथे हवाई दलातील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या संचलनासाठी येथे उपस्थित होते. ते म्हणाले, ""जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीचे चित्रण ज्याप्रकारे केले जात आहे, त्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. दक्षिण काश्‍मीरमधील काही भाग खरोखरीच त्रासदायक आहेत, मात्र यावर उपाय योजले जात आहेत.''

Web Title: hyderabad news army chief bipin rawat