मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का?

मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का?

राममंदिरप्रकरणी असदुद्दीन ओवेसी यांचा हल्लाबोल

हैदराबाद : राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात येईल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सडकून समाचार घेतला. मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का? कोण आहेत ते? असा सवाल ओवेसी यांनी केला. ओवेसी म्हणाले, कोणत्या अधिकाराने मोहन भागवत अयोध्येत मंदिर उभारणार आहेत. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत काय सरन्यायाधीश आहेत का?, अशा शब्दांत ओवेसी यांनी भागवतांवर टीकास्त्र सोडले.
कर्नाटकमधील उडपी येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत भागवत यांनी राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारणार असल्याचा दावा केला होता. राम मंदिरच्या वर एक भगवा झेंडा फडकेल. राम जन्मभूमीवर दुसऱ्या कशाचेही बांधकाम उभारले जाऊ शकत नाही, असेही भागवत म्हणाले होते.

दरम्यान, मंगळवारी (ता.5) अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सध्या दोन्ही बाजूच्या सहमतीने तोडगा काढा असा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिल्यानंतर विविध स्तरातून याबाबत प्रस्ताव देण्यात आले आहेत. नुकताच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनीही अयोध्येत जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शिया वक्‍फ बोर्डनेही अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला. अयोध्येत राम मंदिर आणि लखनौमध्ये मशीद उभारावी, असा प्रस्ताव त्यांनी सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com