विस्थापितांना परत आणण्यात अपयश: उमर अब्दुल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

हैदराबाद : केंद्र आणि राज्यातील "पीडीपी'च्या नेतृत्वाखालील सरकारला विस्थापितांना परत राज्यात आणण्यात अपयश आले असल्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

हैदराबाद : केंद्र आणि राज्यातील "पीडीपी'च्या नेतृत्वाखालील सरकारला विस्थापितांना परत राज्यात आणण्यात अपयश आले असल्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

सध्या अराजकतेच्या छायेमध्ये जगत असलेल्या जम्मू काश्‍मीरमधील जनतेमध्ये टोकाचे ध्रुवीकरण झालेले दिसून येते. आमच्याकडे विस्थापितांची मोठी संख्या असून, यामध्ये काश्‍मिरी पंडितांप्रमाणेच शिखांमधील काही घटकांचाही समावेश होतो. काही काश्‍मिरी मुस्लिमांनीही राज्यातील सध्याची स्थिती पाहून पळ काढला असल्याचे अब्दुल्ला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विस्थापितांना परत राज्यात आणण्याबाबत सरकारच फारसे उत्सुक असल्याचे दिसत नाही. कधीकाळी भाजपनेच काश्‍मिरी पंडितांचे खोऱ्यामध्ये पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन दिले होते, आता प्रत्यक्षात मात्र काहीच घडताना दिसत नाही असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: hyderabad news pdp jammu kashmir omar abdullah