Hyderabad outer ring road crash
esakal
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये शुक्रवारी एक भीषण अपघात घडला. येथील 'आउटर रिंग रोड'वर (ORR) भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 'लॉरी'ला (ट्रकला) जोरदार धडक (Hyderabad ORR accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली.