हैदराबाद प्रकरण : तिचं शरीर पूर्ण जळालंय का? हे पाहण्यासाठी 'ते' पुन्हा आले!

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

शामशाबाद आणि शादनगर या भागात ते फिरत होते. त्यापैकी दोघे तरुणीच्या गाडीवर होते. तर दोघे ट्रकमध्ये होते. आरोपींना तिचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये ठेवला होता.

हैदराबाद : येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिची हत्या केल्याप्रकरणी सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही समाजातील सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या निर्दयी घटनेबाबतच्या अनेक गोष्टींचा अजून उलगडा झाला नाही. याबाबतच्या एकेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. कामावरून घरी परतत असताना डॉक्टर तरुणीवर काही नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथील चट्टनपल्ली गावातील एका पूलाखाली तिचा मृतदेह जाळला. त्यानंतर ते आरोपी तिथून निघून गेले आणि थोड्या वेळाने मृतदेह पूर्ण जळाला आहे की नाही, ते पाहण्यासाठी ते सर्व आरोपी पुन्हा आले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी ते पुन्हा त्याठिकाणी गेले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. 

आणखी वाचा - भाजप नेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ

महत्त्वाची गोष्ट ही की, यापैकी शिवा आणि नवीन नावाच्या दोन आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक जागांची पाहणी केली होती. शामशाबाद आणि शादनगर या भागात ते फिरत होते. त्यापैकी दोघे तरुणीच्या गाडीवर होते. तर दोघे ट्रकमध्ये होते. आरोपींना तिचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये ठेवला होता. शामशाबाद आणि शादनगर भागात लोकांची वर्दळ जास्त असल्याने शेवटी आरोपींनी चट्टनपल्ली गावात तिचा मृतदेह जाळला. 

तपास लवकर पूर्ण करण्याचे महासंचालकांचे आदेश 
या प्रकरणाच्या तपासाचा तेलंगनच्या पोलिस महासंचालकांनी (डीजीपी) रविवारी (ता.1) रात्री आढावा घेतला असून या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. 

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली इजा

तेलंगनचे पोलिस महासंचालक एम. महेंद्र रेड्डी यांनी रविवारी रात्री एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी घटनेची चौकशी कालबद्ध पद्धतीने करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच, रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी (ता.2) दिली.

या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पोलिस चारही आरोपींवर खटला चालविण्यासाठी लवकरात लवकर फास्टट्रॅक न्यायालयाची स्थापना करण्याची विनंती कायदा मंत्रालयाला करणार आहे. तसेच, या गुन्ह्यामधील दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे पोलिस करतील.

-  म्हणून महापोर्टलच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

यावेळी, सायबराबाद पोलिसांनी डॉक्‍टर तरुणीच्या हत्येबाबत सतत कार्यक्रम न दाखवण्याचे आवाहन माध्यमांना केले आहे. तसेच सोशल मीडियामध्ये तिच्या खऱ्या नावाचा वापर न करता 'जस्टिस फॉर दिशा' असे हॅशटॅग चालवण्याची सूचना केली. तसेच चारही आरोपींच्या पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्याची योजना असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad rape and murder case Accused returned to spot to verify body was burnt