Hyderabad Sperm Trafficking Racket : सिकंदराबाद शहरात सरोगसी प्रक्रियेतील गंभीर गैरव्यवहार आणि शुक्राणूंच्या तस्करीचे धक्कादायक रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका डॉक्टरसह (Doctor) दहा जणांना अटक केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) रेजिमेंटल बाजार परिसरातील युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरवर छापा टाकून कारवाई केली. केंद्राच्या व्यवस्थापक डॉ. नम्रता यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले.