निवडणूक प्रचारादरम्यान 'त्याने' धुतली शी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

हैदराबाद: निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना राबवून चर्चेत येण्याचा प्रकार केले जातात. यासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जातो. मात्र, येथील एका कार्यकर्त्याने प्रचारादरम्यान चक्क बाळाची शी धुतली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता हेच पहायचे राहिले होते, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदविल्या आहेत.

तेलंगणात टीआरएस पक्षाच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्याने चक्क लहान बाळाची शी धुतली आहे. यावेळी शेजारी उभे असलेले कार्यकर्ते जय तेलंगणाच्या घोषणा देताना दिसतात. शिवाय, मोटारीच्या चिन्हाकडे बोट दाखवून मतदानाचे आवाहन करताना दिसतात. बाळाची शी धुत असताना तो रडत आहे. मात्र, नेते व कार्यकर्ते हसताना दिसतात. यावेळी बाळाच्या आईने त्याला आपल्या दोन्ही हातांनी पकडल्याचे दिसून येते. तेलंगणातील पत्रकार सीएच सुशील राव यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटिझन्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसतात. आता हेच पहायचे राहिले होते... पासून ते निवडूण येण्यासाठी काहीही करू शकतात. निवडून आल्यानंतर मात्र सर्वसामान्य नागरिकांचा विसर पडतो, अशाही प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदविल्या आहेत.

देशातील 5 राज्यामध्ये निवडणूका होत आहेत. विविध पातळ्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. प्रत्येकजण काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून, नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सोशल मीडियासह कार्यकर्ते दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत. तेलंगणात निवडणूक प्रचार करण्यासाठी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांना अंघोळ घातली. लोकांचे हेअरकट केले, एकाने तर चप्पल देऊन प्रचाराचा फंडा वापरला. पण, टीआरएस पक्षाच्या या कार्यकर्त्याने बाळाची शी धुवून लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: hyderabad trs man washes babys bum to campaign for votes