हैदराबादचेही नाव बदलणार? PM मोदींनी म्हटले ‘भाग्यनगर’

Hyderabad will be renamed Narednra Modi
Hyderabad will be renamed Narednra ModiHyderabad will be renamed Narednra Modi

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संबोधित केले. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदींनी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधित केले. त्यानंतर आता या शहराचे नावही बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान म्हणाले की हैदराबाद हे भाग्यनगर आहे जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.

हैदराबाद (Hyderabad) हे भाग्यनगर आहे. ज्याचे आपल्या सर्वांसाठी महत्त्व आहे. सरदार पटेल यांनी अखंड भारताचा पाया घातला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल्याचे भाजप (Bjp) नेते रविशंकर प्रसाद म्हणाले.

Hyderabad will be renamed Narednra Modi
पती, प्रियकर दोघांसोबतही राहायचे; महिलेचा पोलिस ठाण्यात हट्ट

पंतप्रधानांनी आज भाजपला मिळालेल्या संधी, भाजपचा इतिहास, विकासाचा प्रवास, भाजपचे भवितव्य आणि देशाप्रति असलेली आपली जबाबदारी याविषयी सविस्तरपणे चर्चा केली, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी (Narendra Modi) भाजपच्या जलद विस्ताराचा उल्लेख केला. तसेच तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ सारख्या राज्यांमधील सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. जे आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत आपण त्यांच्यावर हसू नये किंवा त्यांची खिल्ली उडवू नये. त्यांच्याकडून शिकून त्यांनी केलेल्या कृत्यांपासून दूर राहायला हवे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध पक्षांबद्दल सांगितले.

Hyderabad will be renamed Narednra Modi
उमेश कोल्हे खुनाचा सूत्रधार इरफान शेखला ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

आरएसएस हैदराबादला भाग्यनगर म्हणतेय

आरएसएस हैदराबादला भाग्यनगर म्हणत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान भाग्यनगर म्हटले होते. नोव्हेंबर २०२० मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादला आले होते, तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की भाजप निवडून आली तर शहराचे नाव भाग्यनगर केले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागरी निवडणुकांच्या प्रचारासाठी हैदराबादला गेले होते तेव्हा त्यांनी भाग्यनगर मंदिराला भेट देऊन दिवसाची सुरुवात केली. हे मंदिर ४२९ वर्षे जुन्या हैदराबाद शहराला लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com