
भरधाव वेगात क्रेटा कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या चेसिसचे दोन तुकडे झाले होते. तर एअरबॅग्स फुटून कारमध्ये पुढे बसलेले दोघेजण डॅशबोर्डमध्ये अडकले होते. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. भोपाळ शहरात ही दुर्घटना घडली आहे.