मोदींचे हेलिकॉप्टर तपासाबाबत कर्तव्य पार पाडले पण...

I am fighting in the dark says Modi's helicopter investigating officers reaction
I am fighting in the dark says Modi's helicopter investigating officers reaction

भुवनेश्वर (ओडिशा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासाबाबत मी माझे कर्तव्य पार पाडले. मात्र, मला निलंबित करण्यात आले असून, न्यायालयात दाद मागणार आहे, असे मोहम्मद मोहसिन यांनी सांगितले.

मोदी 17 एप्रिल रोजी ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली होती. मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर मोहसिन यांना निलंबीत करण्यात आले. केंद्रीय प्रशासनिक ट्रिब्यूनलकडून मोहसिन यांच्या निलंबनाला स्थगिती दिली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात नियम मोडल्याबद्दल कारवाई करण्याची सूचना केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोहसिन म्हणाले, 'मी माझे कर्तव्य पार पाडले. मात्र, यानंतर मला निलंबित करण्यात आले. या संबंधातील कोणताही अहवाल मला देण्यात आला नाही. मी अंधारात लढाई लढत आहे.'

मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांचे निलंबन झाल्याचे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.

मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते.

दरम्यान, मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून कथितरीत्या एक काळा बॉक्‍स नेण्यात आला होता. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी व्हिडिओ ट्विट करून कॉंग्रेसने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. या तपासणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 मिनिटे उशिर झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com