पोलिसांनो, मी चिंधी चोर नाही- शशिकला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

बंगळूर- मी, चिंधी चोर नाही, पोलिस जीपमध्ये बसणार नाही. कारागृहात जाऊन बसेल. परंतु, पोलिसांच्या जीपमध्ये कैद्याप्रमाणे बसणार नाही, अशा शब्दात व्हि. के. शशिकला यांनी पोलिसांना सुनावले.

तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत पोस गार्डन परिसरातील बंगल्यात राहणाऱया शशिकला या सध्या कारागृहात राहात आहेत. कारागृहातील त्यांचा कैदी क्रमांक 9435 असून, त्यांना मेणबत्या बनविण्याचे काम देण्यात आले आहे. पुढील चार वर्षे त्यांना कारागृहात रहावे लागणार आहे.

पोलिस आपल्याला चोरासारखं जीपमध्ये बसवून कारागृहात नेत असल्याचे शशिकला सहनच झाले नाही. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस त्यांना जीपमध्ये घेऊन जाणार होते. परंतु,  शशिकला यांनी पोलिसांना  स्पष्ट नकार दिला. पोलिसांना त्या म्हणाल्या, मी चिंधी चोर नाही. पोलिसांच्या जीपमध्ये बसणार नाही, असे सांगत चालत घेऊन जाण्याचा आदेशच दिला.
 
शशिकला यांनी बुधवारी (ता. 15) कारागृह परिसरापर्यंत चालत जाणे पसंद केले होते. कारागृह कितीही लांब असले तरी मी चालत येण्यासाठी तयार आहे, असे शशिकला म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: I am not a petty thief- shashikala