सरकार पडले तर पडू दे, मला भीती नाही; कृषी कायद्याविरोधात अमरिंदर सिंग कडाडले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

माझे सरकार पडले तर पडू दे. मला याची भीती नाही. पण मी नेहमीच शेतकऱ्यांबरोबर असेल, असे त्यांनी ठामपणे विधानसभेत सांगितले.

चंदीगड- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा पंजाबमध्ये तीव्र विरोध होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी विधानसभेत कृषी कायद्याच्या विरोधात विधेयक सादर केले आहे. हे विधेयक सादर करताना त्यांनी भावूक भाषणही केले. त्यांनी विरोधी पक्ष अकाली दलवरही निशाणा साधला. माझे सरकार पडले तर पडू दे. मला याची भीती नाही. पण मी नेहमीच शेतकऱ्यांबरोबर असेल, असे त्यांनी ठामपणे विधानसभेत सांगितले.

केंद्राचा कृषी कायदा शेतकरी आणि भूमीहीन मजुरांच्या हिताविरोधी असल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले. यादरम्यान त्यांनी तीन विधेयके विधानसभेत सादर केली. यात शेतकऱ्यांच्या उत्पादन सुविधा कायद्यात दुरुस्ती, जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा, शेतकरी करार आणि कृषी सेवा कायद्यात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले. 

विधेयक सादर करताना अमरिंदर सिंग म्हणाले की, मला सरकार पडण्याची भीती नाही. मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. यापूर्वीही पंजाबसाठी मी राजीनामा दिला होता. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजून उभे आहोत. कृषी दुरुस्ती विधेयक आणि प्रस्तावित विद्युत विधेयक दोन्हीही शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी घातक आहे. 

हेही वाचा- लशीमुळे कोरोना थांबणार नाही, आजार पसरणारच; ब्रिटिश शास्त्रज्ञाचा दावा

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी विधानसभेच्या विशेष सत्रादरम्यान दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908 मध्ये दुरुस्तीसाठी एक विधेयक सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कृषी अध्यादेश आणि विद्युत कायद्यातील संशोधनाविरोधात एक प्रस्ताव ठेवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i am Ready To Resign For Punjab Farmers says amarinder Singh