मला 'टार्गेट' केले जात आहे : रामा मोहन राव

यूएनआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

चेन्नई - प्राप्तिकर खात्याच्या छाप्याने चर्चेत आलेले तमिळनाडूचे माजी मुख्य सचिव डॉ. पी. रामा मोहन राव यांनी आज केंद्र सरकारकडून भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. जिवाला धोका असल्याचे सांगत आपल्याला "टार्गेट' केले जात असल्याचे राव म्हणाले.

चेन्नई - प्राप्तिकर खात्याच्या छाप्याने चर्चेत आलेले तमिळनाडूचे माजी मुख्य सचिव डॉ. पी. रामा मोहन राव यांनी आज केंद्र सरकारकडून भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. जिवाला धोका असल्याचे सांगत आपल्याला "टार्गेट' केले जात असल्याचे राव म्हणाले.

रामा मोहन राव एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, की आपल्या कार्यालयावर प्राप्तिकर खात्याने परवानगी न घेता छापे मारले. आपल्याकडे पंचनाम्याची प्रत आहे. त्यात जे सर्च वॉरंट आहे, त्यात माझे नाही, माझ्या मुलाचे नाव आहे. माझा मुलगा अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कंपनीत होता. तो नुकताच भारतात परतला होता. त्याला आठवडाही झालेला नाही. त्याचबरोबर सीआरपीएफ हे एखाद्या मुख्य सचिवाच्या कार्यालयावर छापा कसा मारू शकतो, असा सवालही राव यांनी केला. ते म्हणाले, की एखाद्या मुख्य सचिवाची बदली दोन मिनिटांत करता येते. जर माझ्या घराची चौकशी करायची होती, तर माझी बदली झाली असती. जर मुख्य सचिवांसमवेत असा व्यवहार केला जात असेल तर सामान्य लोकांची अवस्था काय असेल, असा सवालही राव यांनी उपस्थित केला. प्राप्तिकर खात्याच्या मते, राव यांच्या घरी आणि कार्यालयात छाप्यातून लाखो रुपये आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले होते. मात्र, राव म्हणाले, की घरात केवळ एक लाख 20 हजार 300 रुपये सापडले आणि जे सोने तसेच चांदी जप्त करण्यात आली तरी माझ्या पत्नी आणि मुलीची आहे. मुलाच्या घरी सशस्त्र सीआरपीएफने छापा मारल्याबद्दल राव यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

राव यांनी पत्रकार परिषदेत प्रारंभी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. कॉंग्रेस पक्ष, एआयएडीएमके पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले. उद्योगपती शेखर रेड्डीच्या संबंधांचा इन्कार करत राव म्हणाले, की आपण तमिळनाडूत मोठ्या पदावर काम केले आहे आणि अनेकांची ओळख आहे. मात्र, शेखर रेड्डीशी कोणताही संबंध नाही. 24 डिसेंबरला राव यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. काल रात्री त्यांना दवाखान्यातून सोडल्यानंतर आज त्यांनी आपल्या राहत्या घरी अन्नानगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्राप्तिकर खात्याच्या मते, राव यांच्या घरातून तीस लाखांच्या नवीन नोटा आणि पाच किलो सोने जप्त केले. याशिवाय पाच कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगितले जाते.

Web Title: I am targated : Rama Mohan Rao