मोदींच्या वक्तव्यामुळे मी पूर्णपणे दोषमुक्त : मल्ल्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

मी 1992 पासून ब्रिटनचा नागरिक आहे. मात्र, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करीत मला फरार म्हणणे भाजपला शोभते का, खुद्द पंतप्रधानांनी पूर्ण कर्ज वसूल झाल्याची कबुली दिली तरीही भाजपचे प्रवक्ते का माझ्या मागे लागलेत, असेही मल्ल्याने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.
 
लंडन (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत माझी कर्जापेक्षा अधिक मालमत्ता जप्त केल्याचा खुलासा केला आहे. तरीही भाजपचे प्रवक्ते माझ्यावर का आरोप करीत आहेत, असा सवाल बँकांची कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्‌विटरमार्फत रविवारी केला.

मल्ल्यावर 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, सरकारने त्याची 14 हजार कोटींची मालमत्ता जप्त केल्याने आता तो आणखी अडचणीत आल्याचे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले. त्याचा आधार घेत मल्ल्याने आज सरकारवर निशाणा साधला. मोदींच्या या कबुलीमुळे 'मी पोस्टर बॉय' पूर्णपणे दोषमुक्त झालो आहे, असा दावा मल्ल्याने ट्‌विटद्वारे केला. 
मी 1992 पासून ब्रिटनचा नागरिक आहे. मात्र, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करीत मला फरार म्हणणे भाजपला शोभते का, खुद्द पंतप्रधानांनी पूर्ण कर्ज वसूल झाल्याची कबुली दिली तरीही भाजपचे प्रवक्ते का माझ्या मागे लागलेत, असेही मल्ल्याने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.
 
Web Title: I am totally Free of charge due to statement of Modi says Mallya