मी व्यापाऱ्यांचा आमदार : राज पुरोहित

ब्रह्मदेव चट्टे
गुरुवार, 6 एप्रिल 2017

"मी व्यापाऱ्यांचा आमदार असून माझ्या तोंडात नेहमी व्यापारीच येतात. त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलणार', असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी आज (गुरुवार) विधानसभेत केले आहे. ते संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर या विधयेकाच्या चर्चेत बोलत होते.

मुंबई - "मी व्यापाऱ्यांचा आमदार असून माझ्या तोंडात नेहमी व्यापारीच येतात. त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलणार', असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी आज (गुरुवार) विधानसभेत केले आहे. ते संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर या विधयेकाच्या चर्चेत बोलत होते.

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात येणारे राज पुरोहित यांनी असंबंधपणे या विधेयकावर भाष्य केले. आमदार पुरोहित यांना तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा असल्याचे समजावले. विधानसभेत भाजपचे प्रतोद असणाऱ्या राज पुरोहित यांना बुधवारीच लाल दिवा मिळाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभेतील आमदारांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सारवासारव करत ते म्हणाले, "मी देशातील सगळ्यात मोठ्या बाजारपेठ असणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून मला सतत व्यापाऱ्यांचे हित दिसत असते. त्यामुळे या विधयेकावर बोलताना मला व्यापाऱ्यांची बाजू मांडावी लागेल. यावेळी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी, "तुम्ही फक्त व्यापाऱ्यांचे आमदार नसून मतदार संघातील प्रत्येकाचे प्रतिनिधी आहात', असे निर्देश दिले.

त्यानंतर याच चर्चेत मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सहभाग घेत, राज पुरोहित व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलत आहेत. व्यापार हा पुरोहित यांच्या मतदारसंघात होत असला तरी व्यापारी व पुरोहित हे माझ्या मतदारसंघात राहतात. त्यामुळे ही चर्चा पुढे घेवून जावे लागेल असे सांगत राज पुरोहित यांची बाजू लावून धरली.

Web Title: I am traders MLA : Raj Purohit