आता बहीणही माझ्यासोबत.. I am very Happy..! : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

आम्ही कोठेच बॅकफूटवर खेळणार नाही. गुजरातमध्येही आम्ही बॅकफूटवर खेळलो नव्हतो. आम्ही फ्रंटफूटवर खेळणार आहोत. मायावती आणि अखिलेश यादव यांचा मी पूर्ण आदर करतो. उत्तर प्रदेशात महाआघाडीसाठी आम्ही चर्चेस तयार आहोत. आम्ही काँग्रेसच्या विचारधारेशी लढणार आहोत.

अमेठी : प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना उत्तर प्रदेशात जबाबदारी दिली आहे. मला आनंद आहे, की माझी बहिणीसोबत मी काम करणार असल्याने खूप आनंदी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी आज अमेठी दौऱ्यावर असून, त्याच निमित्त आज काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशची प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राहुल गांधी म्हणाले, की आम्ही कोठेच बॅकफूटवर खेळणार नाही. गुजरातमध्येही आम्ही बॅकफूटवर खेळलो नव्हतो. आम्ही फ्रंटफूटवर खेळणार आहोत. मायावती आणि अखिलेश यादव यांचा मी पूर्ण आदर करतो. उत्तर प्रदेशात महाआघाडीसाठी आम्ही चर्चेस तयार आहोत. आम्ही काँग्रेसच्या विचारधारेशी लढणार आहोत. आगामी निवडणुकीत भाजपला हरविण्याचे आमचे लक्ष्य आहे. उत्तर प्रदेशात पूर्ण शक्तिनिशी लढणार आहोत. उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल असा विश्वास आहे. प्रियंका काँग्रेसची विचारधारा रुजविण्या प्रयत्न करेल. 

Web Title: I am very happy that my sister will now work with me, says Congress President Rahul Gandhi