रोहित वेमुलाचे पत्र वाचून वरुण गांधींना अश्रू अनावर

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

इंदौर - हैद्राबाद विद्यापीठातील डॉक्‍टरेटचा विद्यार्थी रोहित वेमुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र वाचून अश्रू अनावर झाल्याच्या प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

इंदौर - हैद्राबाद विद्यापीठातील डॉक्‍टरेटचा विद्यार्थी रोहित वेमुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र वाचून अश्रू अनावर झाल्याच्या प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

एका खाजगी शाळेत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या 'आयडिया फॉर अ न्यू इंडिया' या विषयावर ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मागील वर्षी हैद्राबाद विद्यापीठातील डॉक्‍टरेटचा अभ्यास करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुलाने आत्महत्या केली. जेव्हा मी त्याचे पत्र वाचले, त्यावेळी मला अश्रू अनावर झाले. 'अशा जातीत जन्म घेऊन पाप केल्याने मी हा टोकाचा निर्णय घेत आहे' या त्याच्या ओळीमुळे माझ्या हृदयाला प्रचंड वेदना झाल्या.' पुढे बोलताना गांधी म्हणाले, 'माध्यान्ह भोजन योजनेत दिले जाणारे अन्न शाळेतील 70 टक्के विद्यार्थी खात नाहीत, कारण ते दुर्बल घटकातील महिलांनी बनविलेले असते. आपण आपल्या मुलांना काय शिकवत आहोत? कोणत्याही जाती धर्मावरून भेदभाव केला जाऊ नये असे आपल्या राज्यघटनेत सांगितले आहे. डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक लोकशाही आवश्‍यक असल्याचे म्हणाले होते.'

रोहितच्या आत्महत्येमुळे देशभर खळबळ माजली होती. रोहितला न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्षांसह देशभरातील दलित संघटनांनी निदर्शने नोंदविली होती.

Web Title: 'I broke into tears' after reading Rohit Vemula's suicide letter: Varun Gandhi