esakal | कोरोना काळात SBI आली पुढे; कोट्यवधींची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

sbi

कोरोना काळात SBI आली पुढे; कोट्यवधींची मदत

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली SBI - कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे देशात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. बेड्स, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची देशात कमतरता आहे. अशात अनेकांनी पुढाकार घेत कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेही मोठी मदत केली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी एसबीआयने कोट्यवधींची मदत केली आहे.

देशात कोरोना परिस्थिती गंभीर बनत आहे. अशात एसबीआय मदतीसाठी पुढे आली असून 71 कोटींची मदत केली आहे. तसेच बँकेने 30 कोटी रुपये देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. ही मदत 1000 बेड्सची सुविधा असलेल्या हॉस्पिटल्सच्या निर्माणासाठी, 250 आयसीयू बनवण्यासाठी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

हेही वाचा: कोरोना संकटात केंद्र सरकारला मोठा दिलासा

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा मोठा फटका बसला आहे. लोकांच्या हॉस्पिटलसमोर रांगा लागत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जात आहे. राज्य आणि केंद्र सरकारची निष्क्रियता यामुळे समोर आली आहे. सोमवारी देशात 368,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे. अशात अनेक खासगी कंपन्या आणि श्रीमंत व्यक्ती मदत करताना दिसत आहेत. पीएम केअर्स फंडसाठी अनेकांनी मोठी रक्कम दिली आहे.

हेही वाचा: कोरोना प्रतिबंधक लस कोणाला, कधी आणि कशी मिळणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष डिनेश खरा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, बँक हॉस्पिटल आणि एनजीओसोबत मिळून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर रुग्णांसाठी मिळण्यासाठी मदत करण्यात येत आहे. बँकने असंही स्पष्ट केलंय, की सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या लसीकरणाचा खर्च बँक उचलणार आहे. मागील वर्षी बँकेने वार्षिक नफ्याच्या 0.25 टक्के पीएम केअर्स फंडमध्ये दिला होता. तसेच लसीकरण मोहिमेसाठी 11 कोटींची मदत केली होती.

loading image
go to top