मतभेद असलेतरी मोदींचा द्वेष नाही : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

भुवनेश्‍वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे मतभेद आहेत; पण मी त्यांचा द्वेष करत नाही. मी राजकीय नेता बनत असताना एक गोष्ट चांगली झाली, मला शिव्याशाप देण्यात आले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेली ही सर्वांत चांगली भेट होती. मोदींना मी शिव्याशाप देताना पाहतो तेव्हा मला त्यांची गळाभेट घ्यावी असे वाटते, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. 

राहुल म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे माझ्याशी असहमत असून मलाही त्यांची मते मान्य नाहीत. मी त्यांच्याविरोधात लढेन. ते पुन्हा पंतप्रधान बनू नयेत म्हणून प्रयत्न करेन; पण मी त्यांचा द्वेष करत नाही. मी त्यांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करतो, त्यांचेही एक विशिष्ट मत आहे हे मला ठावूक आहे. कॉंग्रेस पक्ष लोकांचे मत ऐकतो. येथे मोदींसारखे मलाच सर्व ठावूक आहे, असा भाव नसतो. तेथे प्रतिक्रियांना संधीच नाही. हाच भाजप आणि आमच्यातील सर्वांत मोठा फरक आहे.'' 

संघावर टीका 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्येक संस्थेत घुसायचे आहे. संघ हीच भाजपची जननी आहे. मागील पाच वर्षांत देशाचे जे नुकसान झाले आहे, ते भरून काढण्यासाठी आम्हाला खूप काम करावे लागणार आहे. इतिहासामध्ये प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना माध्यमांसमोर येत स्वत:च्या मनातील खदखद व्यक्त केली. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. 

राहुल म्हणाले 
वरुण यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबाबत माहिती नाही 
भाजप आणि बिजू जनता दल सारखेच 
नवीन पटनाईक हे नरेंद्र मोदींसारखे नाहीत 
नव्या नोकऱ्या निर्माण न होणे हीच खरी समस्या 
प्रियांका यांचा राजकीय प्रवेश अचानक नाही 
नवीन पटनाईक यांच्यावर मोदींचा दबाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com