esakal | मला ‘सीएम’पद नको : मेहबूबा
sakal

बोलून बातमी शोधा

Mehbooba Mufti

मला ‘सीएम’पद नको : मेहबूबा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

जम्मू - जम्मू-काश्‍मीरमधील (Jammu Kashmir) विधानसभा निवडणूकीत (Vidhansabha Election) आपला पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सत्तेवर आला तरी मी मुख्यमंत्रिपद (Chief Minister) स्वीकारणार नाही, असे पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी आज जाहीर केले. (I dont Want the Post of CM Mehbooba Mufti)

पत्रकारांशी बोलताना मेहबूबा म्हणाल्या की, ‘माझा पक्ष निवडणूक जिंकला तरी, पुन्हा एकदा जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याची माझी इच्छा नाही. या पदासाठी पात्र असलेले अनेक नेते माझ्या पक्षात आहेत.’ कलम ३७० आणि ३५ अ हटविल्यानंतरही जम्मू-काश्‍मीरमध्ये कोणताही सकारात्मक बदल झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. ‘दररोज नवीन आदेश लादले जातात. ‘दरबार मूव्ह’ची प्रक्रिया बंद करण्यात आली.

हेही वाचा: डोमिनिका कोर्टाकडून मेहुल चोक्सीला अंतरिम जामीन मंजूर

३७० वे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीर भारताशी जोडले गेले असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे, जसे काही आधी ते वेगळेच होते. हे कलम पुन्हा लागू केल्याशिवाय मुख्यमंत्री बनण्याची माझी इच्छा नाही,’ असे त्या म्हणाल्या. काश्‍मीरमधील स्रोतांमधून लूट करणे, हाच केंद्र सरकारचा एकमेव उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आमच्या अर्थव्यवस्थेवर हल्ले होत आहेत. दिवसेंदिवस आम्ही अधिक गरीब होत आहोत. जम्मू-काश्‍मीरमध्ये विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करत असले तरी आम्हाला मात्र हा विकास कोठेही दिसलेला नाही.

- मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री

loading image