
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आरोग्याचे कारण सांगून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केलंय.
नवी दिल्ली- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आरोग्याचे कारण सांगून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केलंय. पण, मी जनतेसाठी इथून पुढेही काम करतच राहिन, असं त्यांनी म्हटलं. याच पार्श्वभूमीवर सूपरस्टार आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक कॅम्पेननंतर मी रजनीकांत यांची पुन्हा एकदा भेट घेईन. त्यांच्या चाहत्यांप्रमाणेच मी सुद्धा त्यांच्या निर्णयामुळे निराश झालो आहे. पण त्यांचं आरोग्य माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले आहेत.
2020 बद्दल जे बोलला अगदी त्याच्या उलट घडलं; शाळेच्या विद्यार्थ्याची भविष्यवाणी...
रजनीकांत यांनी जानेवारी 2021 मध्ये राजकीय पक्ष स्थापन करणार असल्यांच जाहिर केलं होतं. याबाबत 31 डिसेंबर रोजी घोषणा करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यांनी याबाबत एक टि्वट केलं, त्यात म्हटलं की, चला आता परिवर्तन घडवूयात, आता नाही तर कधीच नाही. त्यांनी पुढे म्हटलं होतं की, आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. आम्ही जनतेला एक पारदर्शी, भ्रष्टाचार मुक्त आणि कोणत्याही धार्मिक-जातीयवाद न करणारे सरकार देऊ. रजनीकांत हे पूर्वीपासून तामिळनाडूमधील जनतेला एक राजकीय पर्याय देण्याबाबत बोलत होते. आता त्यांनी त्या दिशेने आपले पाऊल उचलले आहे, असं वाटत होतं.
I will meet Rajinikanth again after my election campaign. Like his fans, I too have been disappointed but his health is important to me: Kamal Haasan, Makal Needhi Maiam
(file photo) pic.twitter.com/SXi6xKEEx4
— ANI (@ANI) December 29, 2020
निवडणुकीत रिंगण्यात उतरण्याची घोषणा करण्याआधीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍटमिट करण्यात आलं होतं. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये हलवण्यात आलं होतं जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतंच रजनीकांच यांच्या 'अन्नाथे' या सिनेमाचं हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमधील शूटींग थांबवण्यात आलं होतं.
पूर्व डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोरचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; उद्योग, शेतकऱ्यांना...
दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या डिक्शनरीत अशक्य असा शब्द नाही असंच त्याचे चाहते म्हणतात. दक्षिणेत तर रजनीकांत यांची देवासारखी पूजा केली जाते. रजनीकांत यांच्याबद्दल अतिशयोक्ती असलेले विनोदही लोकप्रिय आहेत. क्रिकेट खेळायला लागला तर तो एकटा 15 विकेट घेऊ शकतो, एका चेंडूत 6 सिक्स मारू शकतो किंवा अशा गोष्टी ज्या कल्पनेतही अशक्य वाटतात त्या रजनीकांत सहज करू शकतो असं सहज म्हटल जातं. पण त्याच रजनीकांत यांना आज चाहत्यांची माफी मागावी लागली. आपल्याला एखादी गोष्ट जमणार नाही हे सांगण्याचं दु:ख फक्त मलाच माहिती असं त्यांनी एका पत्रातून म्हटलंय.