
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे पूर्व डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोरच्या (इडीएफसी)‘न्यू भाऊपुर- न्यू खुर्जा सेक्शन’चे उद्घाटन केले.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे पूर्व डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोरच्या (इडीएफसी)‘न्यू भाऊपुर- न्यू खुर्जा सेक्शन’चे उद्घाटन केले. इडीएफसीचा 351 किलोमीटर लांबीचा न्यू भाऊपूर-न्यू खुर्जा सेक्शन 5,750 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आला आहे. हे सेक्शन कानपूर-दिल्ली मुख्य लाईनवरील गर्दी कमी करेल. तसेच भारतीय रेल्वेला हायस्पीड रेल्वे चालवण्यासाठीही मदत करेल. पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराजमधील इडीएफसीच्या नियंत्रण केंद्राचेही उद्घाटन केले.
2020 बद्दल जे बोलला अगदी त्याच्या उलट घडलं; शाळेच्या विद्यार्थ्याची भविष्यवाणी...
काय आहे पूर्व डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर
पूर्व डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर (इडीएफसी) 1856 किलोमीटर लांबीचा आहे. हा कॉरिडोर लुधियाना (पंजाब) साहनेवालपासून सुरु होतो आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यातून जाऊन पश्चिम बंगालच्या दनकुनीमध्ये संपतो. हा सेक्शन स्थानिक उद्योग जसे अॅल्युमीनियम उद्योग (कानपूर), डेअरी क्षेत्र (औरिया जिल्हा), कापड उत्पादन (इटाला जिल्हा), काचेचे सामान उद्योग (फिरोजाबाद जिल्हा), पॉटरी (बुलंदशहर जिल्हा), हिंग उत्पादन (हाथरस जिल्हा) आणि हार्डवेअर (अलीगड जिल्हा) यासाठी नव्या संध्या उपलब्ध करुन देईल.
PM Narendra Modi dedicates New Khurja-New Bhaupur section of Eastern Dedicated Freight Corridor (EDFC) to the nation, through video conferencing. pic.twitter.com/EvbyzChpIH
— ANI (@ANI) December 29, 2020
पूर्व डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोरचा उद्देश राज्यातील मूलभूत सुविधा आणि उद्योगांचा गतीने विकास करण्याचा आहे. अनेक राज्यांमधून जाणाऱ्या या कॉरिडोरचा जवळजवळ 57 टक्के भाग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे हा कॉरिडोर उत्तर प्रदेशासाठी नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहे.
शाळांना जानेवारीत 20 टक्के अनुदानाचा टप्पा ! कोरोनामुळे बदलले पात्रतेचे निकष
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे महाराष्ट्राच्या संगोलातून पश्चिम बंगालच्या शालीमारपर्यंत जाईल. आतापर्यंत 99 किसान रेल्वे 14 राज्यांमध्ये चालवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाहतुकीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी किसान रेल्वे सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतमाल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवणे शक्य झाले.