दिल्ली : "मला समन्स बजावलेलं नाही"; वानखेडेंचं स्पष्टीकरण

वानखेडेंची दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणार चौकशी
Sameer Wankhede
Sameer WankhedeTeam eSakal

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. यावेळी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरं देताना मला "समन्स बजावण्यात आलेलं नाही" असं त्यांनी सांगितलं. आरोपांनंतर वानखेडे यांची एनसीबीच्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. आर्यन खान प्रकरणामुळं ते सध्या चर्चेत आले आहेत.

महाराष्ट्र आणि संपूर्ण बॉलिवूडसह देशात सध्या चर्चेत असलेल्या आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला कॅडेलिया क्रूझवरील पार्टीदरम्यान ड्रग्जसह एनसीबीनं अटक केली. त्यानंतर तो सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत असून ही कारवाई करणारे समीर वानखेडे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, नुकताच क्रूझवरील छाप्यादरम्यान एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईल या व्यक्तीनं वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर वानखेडे यांची आपल्याच दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. त्यामुळेच वानखेडे सध्या दिल्लीत पोहोचले आहेत.

पण दिल्लीत पोहोचल्यानंतर "आपल्याला दिल्लीतून समन्स बजावण्यात आलेलं नाही. मी इथं वेगळ्या कारणासाठी आलेलो आहे. माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत," असा दावाही त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com