मौलवींच्या फतव्यानंतर नुसरत जहाँचे प्रत्युत्तर

Nusrat Jahan
Nusrat Jahan

नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींनी खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्याविरुद्ध फतवा काढल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना मी सार्वभौम भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटले आहे.

बांगला चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व तृणमूल काँग्रेस पक्षाच्या साखदार नुसरत जहाँ या नुकत्याच विवाहबद्ध झाल्या. कोलकत्यातील उद्योजक निखिल जैन तुर्कस्तानमधील बोडरम येथे त्यांचा विवाह हिंदू रीती-रिवाजानुसार झाला. त्यानंतर त्यांनी संसदेत शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी लावलेल्या कुंकू आणि मंगळसूत्रावरून मौलवींकडून त्यांच्याविरोधात फतवा काढला होता.

याला प्रत्युत्तर देताना नुसरत जहाँ म्हणाल्या, की  मी संसदेत प्रत्येक धर्माचे प्रतिनिधित्व करत आहे. येथे कोणत्याही धर्माचे बंधन नाही. मी अजूनही मुस्लिम असून, याशिवाय मला आणखी बोलायचे नाही. मी काय परिधान केले यावर बोलायचा अधिकार कोणाला नाही. 

गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नूसरत जहॉं यांनी बशीरघाट मतदारसंघातून विजय मिळवीत संसदेत प्रथमच प्रवेश केला. निखिल जैन यांच्याशी विवाह करून खासदाकीबरोबरच वैवाहिक जीवनाचीही सुरवात केली आहे. निखिल यांचा कापडाचा व्यवसाय आहे. या दोघांची ओळख गेल्या वर्षी दुर्गापूजेत झाली होती. यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या व त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहाला नुसरत व निखिल यांच्या कुटुंबासह जवळचा मित्रपरिवारच उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com