चहाविक्रीतून सावकार बनलेल्याकडे सापडली 400 कोटींची संपत्ती!

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

सूरत (गुजरात) : प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात चहाविक्री करून सावकार बनलेल्या एका व्यक्तीकडे रोख रक्कम, सोने, स्थावर मालमत्ता स्वरुपातील तब्बल 400 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे.

सूरत (गुजरात) : प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात चहाविक्री करून सावकार बनलेल्या एका व्यक्तीकडे रोख रक्कम, सोने, स्थावर मालमत्ता स्वरुपातील तब्बल 400 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे.

प्राप्तीकर विभागाने शनिवारी शहरात चहाविक्रीतून सावकार बनलेल्या किशोर भाईज्वाला नावाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाच्य परिसरासरात छापा टाकला. त्यामध्ये किशोरकडे 400 कोटींची संपत्ती असल्याचे आढळून आले. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार प्राप्तीकर विभाग आणखी काही सापडते का याचा शोध घेत आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने मोहाली आणि चंदीगडमध्ये केलेल्या कारवाईत 30 लाख रुपये सापडले आहेत. त्यामध्ये 18 लाख रुपये किंमतीच्या चलनातील नव्या नोटा आहेत. तर अडीच किलो सोन्याचाही समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काळा पैसा धारक चिंतेत असून वेगवेगळ्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्राप्तीकर विभाग आणि पोलिस कारवाई करत बेहिशेबी मालमत्ता (काळा पैसा) जप्त करत आहेत.

Web Title: I-T seizes Rs 400 crores from tea seller-turned-financier in Surat