

Operation Sindur Air Strike : पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ भारतीय सैन्य दलांनी आज मध्यरात्री उद्ध्वस्त केले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. पण ही कारवाई होणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार तास आधीच एका जाहीर कार्यक्रमात दिले होते. याबाबत पंतप्रधानांनी नेमके काय संकेत दिले होते, जाणून घेऊयात.