देश
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अजित डोवाल यांची नेमकी भूमिका काय?
अजित डोवाल हे २०१४ पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यापूर्वी ते एक रॉ एजंट होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये मोहिमा राबविल्या होत्या.
Ajit Doval: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बदला घेत पाकिस्तानातल्या ९ दहशतवादी स्थळांवर हल्ले केले. भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे ही कारवाई केली. रात्री १ वाजून ५ मिनिटांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचं सांगितलं जात आहे. भारताने तब्बल १५ दिवसांनंतर हे प्रत्युत्तर दिलं आहे.

