मी नंतर फोन करतो; हुतात्मा होण्यापूर्वी जवानाचा पत्नीला फोन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

हल्ल्यापूर्वी हुतात्मा झालेले जवान मनोज बेरेरा यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो म्हणून फोन बंद केला. त्यानंतर काही तासांत हा हल्ला झाला अन् या हल्ल्यात ते हुतात्मा झाले. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यापूर्वी हुतात्मा झालेले जवान मनोज बेरेरा यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो म्हणून फोन बंद केला. त्यानंतर काही तासांत हा हल्ला झाला अन् या हल्ल्यात ते हुतात्मा झाले. 

मनोज बेरेरा हे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) सेवेत कार्यरत होते. ओडिशातील कट्टक जिल्ह्यात त्यांचे कुटुंबिय वास्तव्यास आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी विवाह केला होता. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. आत्मघाती हल्ला होण्याच्या काही तासांपूर्वी मनोज यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी फोनवरून आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो असे सांगितले. त्यांचा हा फोन अखेरचा ठरला. 

दरम्यान, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मनोज बेरेरा त्यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मूळगावी रतनपूर येथे आले होते. काल (गुरुवार) सकाळी त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला श्रीनगर येथे येण्याचे सांगितले होते, अशी माहिती मनोज यांचे मेहुणे देवाशिश बेहेरा यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will call back Odisha CRPF soldier told wife before Pulwama attack