Bihar : ...तर 'जन सुरज अभियान' मागे घेईन, प्रशांत किशोरांचे नितीश सरकारला चॅलेंज

Prashant Kishor
Prashant Kishor Sakal

Prashant Kishor On Bihar Politics : बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडीचे सरकार येत्या एक-दोन वर्षांत 5-10 लाख नोकऱ्या देण्यात यशस्वी ठरले, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधातील जन सुरज अभियान मागे घेतले जाईल, असे विधान राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. बुधवारी 'जन सुरज अभियान' अंतर्गत समस्तीपूर येथे पोहोचलेल्या प्रशांत किशोर यांनी नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारच्या 10 लाख नोकऱ्या देण्याच्या आश्वासनावर वरील विधान केले आहे.

Prashant Kishor
बाहुबली नेते मुख्तार अन्सारींवर ED ची मोठी कारवाई; दिल्ली, लखनौ, गाझीपूरसह अनेक ठिकाणी छापे

प्रशांत किशोर म्हणाले की, शाळांमध्ये शिकवणाऱ्या नोकरदार शिक्षकांना सरकार वेळेवर पगार देऊ शकत नाही, तर हे सरकार नवीन नोकऱ्या कोठून देऊ शकणार आहे. आम्हाला येऊन फक्त तीन महिने झालेले असताना बिहारचे राजकारण 180 अंशांनी फिरले गेले आहे. परंतु, पुढच्या विधानसभा निवडणुका येईपर्यंत बिहारच्या राजकारण अनेक पटीने वळण घेईल असे ते म्हणाले.

Prashant Kishor
Video : कोचिंग क्लासहून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गोळीबार

गेल्या काही वर्षांत तिसऱ्यांदा बिहार सरकारचे समीकरण बदलण्याच्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर खुर्चीला चिकटून बसल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की, इतर पक्ष इकडे तिकडे फिरत राहतात. या सरकारला जनतेने मतदान केले नाही, हे सरकार जुगाडावर चालत असून, यावर जनतेचा विश्वास नाही. यावेळी त्यांनी 2005 ते 2010 दरम्यान बिहारमधील एनडीए सरकारच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com