IAF :भारताच्या ऐतिहासिक लढाऊ विमानाची जागा घेणार नविन फायटर जेट, वायुसेना १०० विमानांची देणार ऑर्डर

भारतीय वायुसेनेने मिग-२१ विमानांची जागा घेण्यासाठी नविन फायटर जेट्सची ऑर्डर दिली आहे.
IAF :भारताच्या ऐतिहासिक लढाऊ विमानाची जागा घेणार नविन फायटर जेट, वायुसेना १०० विमानांची देणार ऑर्डर

IAF Tejas:भारतीय हवाई दल (IAF) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून सुमारे 100 अतिरिक्त हलके लढाऊ विमान (LCA) तेजस मार्क-1A लढाऊ विमानांची ऑर्डर देण्यात येणार आहे, अशी माहिती एएनआयकडून मिळाली आहे.

भारतीय वायुसेनेच्या या पाऊलामुळे स्वदेशी एरोस्पेस उद्योगाला चालना मिळणार आहे. मिग-21 लढाऊ विमानांच्या जुन्या ताफ्याला बदलण्यासाठी आणखी 100 तेजस मार्क-1ए लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तेजस मार्क-1A हे स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि निर्मित आधुनिक 4-प्लस पिढीचे लढाऊ विमान असून 65 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक आहेत.

स्वदेशी विकसित अ‍ॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले अ‍ॅरे (AESA) रडार, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्र, आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) सूट आणि एअर-टू-एअर रिफ्युएलिंग (AAR) क्षमतांसह, तेजस MK1 A ऑपरेशनल करण्यात येईल.

अलीकडेच, IAF प्रमुख VR चौधरी यांनी देखील तेजस मार्क-1A च्या विकास प्रकल्पाचा आढावा घेतला आणि हे विमान आपल्या ताफ्याचे स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने IAF च्या प्रयत्नांचे ध्वजवाहक असल्याचे समोर आले.

यापूर्वी 2021 मध्ये, IAF ने 73 LCA तेजस मार्क-1A लढाऊ विमाने आणि 10 LCA तेजस मार्क-1 विमानांच्या वितरणासाठी HAL सोबत करार केला होता.(Latest Marathi News)

IAF :भारताच्या ऐतिहासिक लढाऊ विमानाची जागा घेणार नविन फायटर जेट, वायुसेना १०० विमानांची देणार ऑर्डर
Russia-Ukraine Crisis:वॅगनर प्रमुखाच्या मृत्यूमागे युक्रेनचा हात? राष्ट्रपती झेलेन्स्कींनी दिले स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com