शत्रुच्या मनात धडकी भरवणारा IAF चा 'आयर्न फिस्ट' यावर्षी रद्द?

airforce.jpg
airforce.jpg
Updated on

पूर्व लडाख सेक्टरमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवरील स्थितीमुळे इंडियन एअर फोर्स यावर्षी एक सर्वात  मोठा आणि महत्त्वाचा युद्ध सराव करणार नाहीय. या युद्धसरावात एअरफोर्सची २०० विमाने सहभागी होतात. त्यावरुनच हा किती मोठा युद्धसराव असेल, याची कल्पना येते. मागच्या वर्षीपासून पूर्व लडाख सीमेवर भारताचा चीन बरोबर सीमावाद सुरु आहे. मुख्य कळीचा मुद्दा असलेल्या पँगाँग टीएसओ सेक्टरमधुन चीनने माघार घेतली असली, तरी अजूनही सीमावादाचा हा तिढा सुटलेला नाही. भारतीय सैन्याबरोबर इंडियन एअर फोर्सही सर्वोच्च अलर्ट मोडवर आहे. चीनने कुठलीही कुरघोडी केली, तर त्याला लागलीच प्रत्युत्तर देण्याची सज्जत IAF ने ठेवली आहे. 

इंडियन एअर फोर्सचा 'आयर्न फिस्ट' हा युद्ध सराव दर तीन वर्षांनी होतो. या युद्ध सरावातून भारत आपली हवाई शक्ती दाखवतो. या महिन्यात राजस्थानच्या पोखरण टेस्ट तळावर 'आयर्न फिस्ट' युद्ध सराव होणार होता. पण हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चालू वर्षात हवाई दलाच्या प्रशिक्षण वेळापत्रकातून 'आयर्न फिस्ट' सरावाचा उल्लेख केलेला नाही. 

IAF ची काय क्षमता आहे? ते दाखवून देण्याच्या दृष्टीने 'आयर्न फिस्ट' हा महत्त्वाचा युद्धसराव असतो. यावर्षी एअर फोर्सने लडाखवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे, यावर्षी हा युद्धसराव होणार नाही असे हवाई दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

यापूर्वी २०१६ साली आयर्न फिस्ट युद्ध सराव झाला होता. त्यावेळी १८१ विमाने या युद्धसरावात सहभागी झाली होती. यात १०३ फायटर विमाने होती. त्यावेळी आयर्न फिस्टमध्ये ५७२ रॉकेट, ८१ बॉम्ब आणि नऊ मिसाइल्स डागण्यात आली होती. या शस्त्रांमध्ये नजरेपलीकडील लक्ष्याचा भेद करणारे स्वदेशी अस्त्र आणि आकाश मिसाइलचा समावेश होता. 

" 'आयर्न फिस्ट' मधुन भारताचे हवाई दल लष्करी दृष्टया शत्रूचा सामना करण्यासाठी किती सक्षम आहे, याची प्रचिती देशवासियांना येते. सध्या IAF लडाखमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे यावर्षी सराव होणार नाही" असे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी सांगितले.

'आयर्न फिस्ट'चा पहिला सराव २०१३ मध्ये झाला होता. २०१९ मध्ये हा सराव झाला नाही. २०१८ मध्ये एअर फोर्सने 'गगनशक्ती' युद्ध सराव केला. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान बरोबर युद्ध लढण्याची वेळ आल्यास, आपण कितपत तयार आहोत, त्याची चाचपणी करणे, हा 'गगनशक्ती' मागचा मूळ उद्देश होता. 

दिवसा-रात्री किंवा कुठल्याही वातावरणात युद्ध लढण्यास आम्ही सक्षम आहोत, हे इंडियन एअर फोर्स लडाखमध्ये दाखवून दिले आहे. भारताची अव्वल फायटर जेट्स, लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि बहुउद्देशील हेलिकॉप्टर्स तिथे तैनात आहेत. पूर्व लडाखमध्ये आपली लष्करी स्थिती बळकट करण्यासाठी भारताने तिथे राफेल फायटर विमानेही तैनात केली आहेत. राफेल हे भारताने फ्रान्सकडून विकत घेतलेले, सर्वात घातक फायटर विमान आहे. मागच्यावर्षीच जुलै महिन्यात ही विमाने भारतीय हवाई दलाचा एक भाग झाली. 

एअर फोर्सची मिग-२९, सुखोई-३०, अपाची AH-64E आणि चिनूक CH-47F (I) लडाखमध्ये चीनच्या कुठल्याही कुरघोडी उधळून लावण्यासाठी तयार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com