मुंबईत आतापर्यंत इतक्या लाख लोकांनी घेतली लस 

vaccine.jpg
vaccine.jpg
Updated on

मुंबई : मुंबईत आतापर्यंत 10 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20 टक्के लसीकरण झाले आहे. त्यात आता सरसकट 45 वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याने ताण अधिक वाढणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लवकरात लवकर लसीकरण उरकायचे असल्याने पालिका प्रशासनाला त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उद्या पासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण 40 लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत 2 सत्रांत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण 20 टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत 10 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.

सध्या ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत 45 वर्षांवरील निरोगी नागरिकांची संख्या साधारण 40 लाख आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेत गुरुवारपासून या नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता 2 सत्रात ही मोहीम राबवण्यात येणार असून सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.
सध्या लसीकरणाची एकूण 108 केंद्रे असून त्यापैकी 29 पालिकेची, राज्य व केंद्र सरकारची 13 आहेत. त्याचप्रमाणे 66 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार असल्याने आणखी 26 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या दररोज सरासरी 40 ते 45 हजारपर्यंत कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या दर दिवशी लाखांपर्यंत नेण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. 

मुंबईतील लसीकरण पावसाच्या आधी म्हणजेच पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिकेने एका दिवसात अधिकाधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी ही केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र ती परवानगी मिळू शकलेली नाही. त्यामुळे पालिका आता लसीकरण केंद्र वाढवून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 

उद्यापासून 45 वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असून त्यासाठी पालिका तयार आहे. लशीचा पुरवठा सुरळीत होत असून सध्या मुंबईत 2 लाख मात्रा उपलब्ध आहेत. दिवसाला 40 हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. सध्या लशीचा साठा योग्य प्रमाणात असून लस देण्याचीही तयारी झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com