नैतिकता शिकवणारे IAS दाम्पत्य वादात, ५१ कोटींचा ठोठावलेला दंड ४०३२ रुपये केला; १० कोटी लाच घेतल्याचा आरोप

IAS Nagarjun B Gowda : आय़एएस नागार्जुन बी गौडा हे सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. एमबीबीएस झाल्यानंतर युपीएससीतून आयएएस बनलेल्या गौडा यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप होत आहेत. त्यांची पत्नीही IAS आहे.
Bribery allegations surface against IAS officer Nagarjun B Gowda

Bribery allegations surface against IAS officer Nagarjun B Gowda

Esakal

Updated on

नैतिकतेचे धडे देणारे आयएएस दाम्पत्य अशी ओळख असलेले आयएएस डॉक्टर नागार्जुन बी गौंडा आणि आयएएस सृष्टी देशमुख सध्या चर्चेत आहेत. हरदा खाण प्रकरणी कारवाईवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. खाण प्रकरणी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आयएएस डॉक्टर नागार्जुन बी यांच्यावर होत आहे. युपीएससी करणाऱ्यांसाठी आदर्श असलेल्या नागार्जुन यांच्यावर आऱोपांमुळे खळबळ उडालीय. एक आरटीआय कार्यकर्ते आनंद जाट यांनी लाच प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com