

IAS Officer Corruption rajasthan
esakal
IAS Officer Misuse of Power : राजस्थानमध्ये आयएएस अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून खासगी रिसॉर्ट कंपनीला आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल यांनी कुटुंबीयांच्या नावावर दोन रिसॉर्टमध्ये ४० व्हिला आणि कॉटेज खरेदी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या मालमत्ता पुन्हा संबंधित कंपनीलाच भाडेतत्त्वावर दिल्या. यातून कुटुंबाला दरवर्षी सुमारे १.८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा संशय आहे. राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.