लखनौत IAS अधिकाऱ्याचा रस्त्यावर सापडला मृतदेह

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

लखनौ (उत्तर प्रदेश) : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनुराग तिवारी यांचा आज (बुधवार) सकाळी रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत असलेला मृतदेह सापडला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनुराग तिवारी यांचा आज (बुधवार) सकाळी रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत असलेला मृतदेह सापडला आहे.

लखनौपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहारिच हे तिवारी यांचे मूळ गाव होते. तिवारी कर्नाटक केडरमधील 2007 च्या बॅचमधून प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. हजरतगंज परिसरातील मीराबाई गेस्ट हाऊसजवळ आज त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या दोन दिवसांपासून तिवारी यांचा मुक्काम मीराबाई गेस्ट होऊसमध्ये होता. आज रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना रस्त्यावर असलेल्या मृतदेहाविषयी माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिवारी यांच्याकडील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवली. पुढील तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.

Web Title: IAS Officer Found Dead On Roadside In Lucknow