

Mamata Banerjee Linked IAS Officer Resigns After Defeat
Esakal
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींना अनेक धक्के बसत आहेत. एका बाजुला ममता बॅनर्जी निकालानंतर आक्रमकपणे भाजपवर टीका करत आहेत. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक अधिकारी आणि वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या दिग्गजांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये पत्रकार, अर्थतज्ज्ञ आणि काही माजी आयएएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.