

Supreme Court
esakal
सर्वोच्च न्यायालयाने आयएएस आणि आयपीएससारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देत राहावा की नाही, याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे देशात आरक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या या तोंडी निरीक्षणामुळे आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुटुंबाने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कोणत्या पातळीपर्यंत प्रगती साधल्यानंतर वंचितांसाठी राखीव असलेल्या जागांवरील दावा सोडावा लागेल, हा मूलभूत मुद्दा आता चर्चेत आला आहे.