ICICI Bank Loan Fraud: सीबीआयने चंदा-दीपक कोचरवर केली कडक कारवाई, आरोपपत्र दाखल

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर आता कर्ज फसवणूक प्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे.
Chanda Kochhar
Chanda Kochhar sakal

ICICI Bank Loan Fraud: आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर आता कर्ज फसवणूक प्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात याशिवाय आणखी सहा जणांची नावे आहेत.

वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचे म्हणणे आहे. त्या बदल्यात चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा करत व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्ज दिले होते.

धूत यांचे नातेवाईक, चार्टर्ड अकाउंटचे नावही समाविष्ट :

कोचर आणि धूत यांच्याशिवाय सीबीआयच्या आरोपपत्रात चार्टर्ड अकाउंटंट आणि धूत यांच्या नातेवाईकाचीही नावे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात सादर केले आहे.

कोचर दाम्पत्याला डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली :

कर्ज फसवणूक प्रकरणी सीबीआयने कोचर दाम्पत्याला गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी अटक केली होती. तर धूत यांना तीन दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणी पहिली एफआयआर 2019 मध्ये नोंदवण्यात आली होती.

Chanda Kochhar
Adani Total Gas: अदानी टोटल गॅसने CNG-PNG च्या दरात केली मोठी कपात, मध्यरात्री 12 पासून नवीन दर लागू

हे प्रकरण व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांपेक्षा कर्जाच्या वाटपाशी संबंधित आहे. त्यांच्या अटकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कोचर यांची 9 जानेवारीला तर धूत यांची 20 जानेवारीला जामिनावर सुटका केली होती.

2012 मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा 50 % हिस्सा आहे.

आयसीआयसीआय बँकेकडून देण्यात आलेले हे कर्ज नंतर एनपीए झाले आणि नंतर या प्रकरणाला "बँक फ्रॉड" असे म्हटले गेले. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती.

Chanda Kochhar
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com