कोरोनाला रोखण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा लॉकडाउन गरजेचा : ICMR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस भारत तोंड देत आहे. दररोज जवळपास साडे तीन लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा लॉकडाउन गरजेचा : ICMR

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Corona second wave) दोन हात करत आहे. अशा परिस्थितीत सर्व राज्यांनी आपापल्या परीने पावले उचलली आहेत. देशातील अनेक जिल्हे आणि राज्ये लॉकडाउनच्या (Lockdown) स्थितीत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एक सल्ला दिला आहे. कोरोना संक्रमणाचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये ६ ते ८ आठवड्यांचा लॉकडाउन गरजेचा आहे, असे डॉ. भार्गव यांचे म्हणणे आहे. (ICMR advice 6 to 8 weeks lockdown should be important in some district where covid infection rate high)

देशात कोरोना संक्रमणाचे प्रमाण २१ टक्के आहे. ७३४ पैकी ३१० जिल्ह्यांमध्ये हा दर बरोबर किंवा त्याहून अधिक आहे, अशी माहिती डॉ. भार्गव यांनी मंगळवारी (ता.११) पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: कोरेगाव भीमा दंगल : गौतम नवलखांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कोरोनाचा धोका सर्वात जास्त तरुण वर्गाला

तरुण वर्गातील आकडेवारी सर्वात जास्त आहे, याबाबत विचारले असता डॉ. भार्गव म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची आकडेवारी पाहिल्यास असे दिसून येते की, वयामध्ये फारसा फरक नसल्याचे दिसून येते. ४० वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक कोरोनाला लवकर बळी पडतात. तरुण वर्ग जास्त प्रवास करत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस भारत तोंड देत आहे. दररोज जवळपास साडे तीन लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत.

हेही वाचा: लसीचा तुटवडा संपणार; भारताच्या मदतीनं लस उत्पादन करण्याचा अमेरिकेचा विचार

कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याचे मंगळवारी सरकारने स्पष्ट केले. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब ही राज्ये त्या १६ राज्यांपैकी आहेत, ज्यांमध्ये दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगना या राज्यांमधील रुग्णसंख्येत दररोज घट होत चालल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: Icmr Advice 6 To 8 Weeks Lockdown Important In Some District Where Covid 19 Infection Rate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaicmrCorona Pandemic
go to top