"मोदींना स्वतंत्रता दिनी घोषणा करता यावी म्हणून कोविड-19 लस निर्मितीसाठी दबाव"

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 जुलै 2020

माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी शुक्रवारी भारतीय आयुर्विज्ञान आणि अनुसंधान परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्रता दिवशी घोषणा करता यावी, यासाठी कोरोनावरील लस निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली- माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी शुक्रवारी भारतीय आयुर्विज्ञान आणि अनुसंधान परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्रता दिवशी घोषणा करता यावी, यासाठी कोरोनावरील लस निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वैज्ञानिक संशोधन हे आदेशानुसार चालत नाही. मात्र, आईसीएमआरकडून कोरोनोवरील लस 15 ऑगस्टपर्यंत तयार करण्यासाठी भारत बॉयोटेकवर दबाव आणला जात आहे, असं ते म्हणाले आहेत.

ते पोलिस ओरडून सांगत होते, आम्हाला जीवे मारुन तुम्ही वाचणार नाही!
सीताराम येचुरी यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. लस ही वैश्विक महामारीवरील निर्णायक समाधान आहे. जग एका सुरक्षित आणि सर्वांना उपलब्ध होईल अशी लस निर्माण होण्याची वाट पाहात आहे. मात्र, वैज्ञानिक संशोधन आदेशाद्वारे होऊ शकत नाही. त्यासाठी एक विशिष्ठ प्रक्रिया असून त्याला वेळ द्यावा लागतो. आरोग्य आणि सुरक्षेचे निकष बाजूला ठेवून कोरोनावरील लस तयार करण्यासाठी वैज्ञानिकांवर दबाव आणला जात आहे. जेणेकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी याची घोषणा करु शकतील. याची मानवी जीवनाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असा इशारा त्यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

येचुरी यांनी आईसीएमआरवर गंभीर आरोप केले आहेत. आईसीएमआर वैद्यकीय संस्थांना आपल्या आदेशानुसार काम करण्यासाठी धमकी देत आहे. हैदराबादमधील निम्स संस्था राज्य सरकारच्या अखत्यारित येते.  आईसीएमआरने तेलंगाना सरकारची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला : मोदी
कोरोना लसीच्या परिक्षणासंदर्भातही येचुरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लसीचा प्रयोग किती लोकांवर करण्यात येणार आहे? 14 ऑगस्ट पूर्वी पहिले, दुसरे आणि तिसऱ्या चरणातील परीक्षण पूर्ण होऊन त्यांचे विश्लेषण केले जाईल का? स्वतंत्र डेटा सुरक्षा परिक्षण समितीचे(डीएसएमसी) सदस्य कोण आहेत? अशा काही गंभीर प्रश्नांचे उत्तर दिले जाणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले आहेत.

भारत औषधी महानियंत्रकांद्वारे (डीसीजीआई) लसीची सुरक्षितता आणि त्याच्या प्रभावीपणाचा अभ्यास होण्यापूर्वीच आईसीएमआरने लस उपलब्ध करुन देण्याची तारीख कशाचे आधारे निश्चित केली. एका खासगी कंपनीकडून विकसीत होणाऱ्या लसीच्या परिक्षणसाठी आक्रमकता आणि दबाव आणण्याचे आईसीएमआरचे काय कारण आहे? असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, भारत बायोटेकने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. कोरोनावर लस तयार झाल्याचा दावा करणारी भारतातील ही पहिली संस्था ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icmr pressure for preparing covid-19 vacine so pm modi can announce on 15 august