esakal | दुर्गम भागात ड्रोनद्वारे लसवितरण; आरोग्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गम भागात ड्रोनद्वारे लसवितरण; आरोग्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

दुर्गम भागात ड्रोनद्वारे लसवितरण; आरोग्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली: ICMR च्या पुढाकाराने आता 'ड्रोन-आधारित लस वितरण प्रणाली' निर्माण करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आज या प्रणालीचे उद्घाटन केले. भारताच्या उत्तर-पूर्व भागात ICMR च्या या प्रणालीची आवश्यकता लक्षात घेऊन हा उपक्रम आज सुरु करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ड्रोनच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांपर्यंत लस पोहोचवली जाईल. या निमित्ताने त्यांनी सांगितलं की, 15 मिनिटांमध्ये 31 किलोमीटरचं अंतर पूर्ण करत, मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्हा रुग्णालयातून करंग आरोग्य केंद्रापर्यंत ड्रोनपर्यंत नेण्यात आलं.

हेही वाचा: बच्चन यांच्या आवाजाला वैतागलात? अशी बंद करा कोरोना कॉलर ट्यून

मनसुख मांडविय यांनी यावेळी म्हटलंय की, हे दक्षिण आशियामधील ड्रोनचे पहिले व्यवसायिक उड्डाण आहे. यामध्ये 13-15 मिनिटांमध्ये 31 किलोमीटरचे अंतर पार करण्यात आलं आहे. हे फक्त लशींच्या पुरवठ्यांसाठी नाहीये तर भविष्यात आपण ड्रोनचा उपयोग रक्ताचे नमुने, आवश्यक औषधांच्या वाहतुकीसाठी देखील करु शकतो. सोबतच त्यांनी म्हटलं की, देशात आतापर्यंत 91 कोटी लस देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top