Ramoji Rao
Ramoji Rao

Ramoji Rao passed away: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे दु:खद निधन; 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ramoji Rao Died: माध्यम आणि चित्रपट जगताचे सम्राट रामोजी राव यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते.

हैदराबाद- माध्यम आणि चित्रपट जगताचे सम्राट रामोजी राव यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. भव्य आणि प्रसिद्ध अशा रामोजी फिल्म सिटीचे ते संस्थापक होते. शिवाय माध्यम संस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे. तब्येत बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात रामोजी राव यांचे नाव मोठे आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांना शनिवारी हैदराबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. सकाळी चारच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार जी किशन रेड्डी यांनी ट्वीट करुन यांसदर्भात दु:ख व्यक्त केलं.

Ramoji Rao
Hyderabad CEO Death Video : स्टंटच्या नादात कंपनीच्या सीईओंनी गमावला जीव; रामोजी फिल्म सिटीतील दुर्घटनेचा व्हिडिओ समोर

रामोजी राव यांना हैदराबादमधील नानाक्रमगुडा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते, तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडतच चालली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ वाजून ५० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी ते कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झाले होते.

Ramoji Rao
Nashik: रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करा; पालकमंत्र्यांचे पर्यटन मंत्र्यांना साकडे

हैदराबाद शहराच्या बाहेर रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी बसवली आहे. याठिकाणी अनेक चित्रपटांचे शुटिंग पार पडत असते. भव्य सेट आणि निसर्ग यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. देशभरातील लोक रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी येथे येत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com