70 वर्षे जुन्या आरके स्टुडिओची होणार विक्री

वृत्तसंस्था
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कपूर कुटुंबीय हा स्टुडिओ विकण्यासाठी बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्सच्या संपर्कात आहे. कपूर कुटुंबियांकडून ऋषी कपूर यांनी सांगितले, की आम्ही स्टुडिओची पुनर्बांधणी केली होती. मात्र, स्टुडिओची पुनर्बांधणी करणे नेहमीच शक्य नाही. अनेकदा सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार होत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे याबाबत दु:खी आहोत आणि आता आम्ही हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांच्या आरके स्टुडिओची आता विक्री करण्यात येणार आहे. राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी चेंबूरमध्ये आरके स्टुडिओची निर्मिती केली. मात्र, आता हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय राज कपूर यांची पत्नी कृष्णा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी घेतला आहे.

कपूर कुटुंबीय हा स्टुडिओ विकण्यासाठी बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्सच्या संपर्कात आहे. कपूर कुटुंबियांकडून ऋषी कपूर यांनी सांगितले, की आम्ही स्टुडिओची पुनर्बांधणी केली होती. मात्र, स्टुडिओची पुनर्बांधणी करणे नेहमीच शक्य नाही. अनेकदा सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार होत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे याबाबत दु:खी आहोत आणि आता आम्ही हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, राज कपूर यांनी दोन एकर जागेत वसलेल्या या आरके स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली. मागील वर्षी 16 सप्टेंबरला स्टुडिओला आग लागली होती. या आगीमुळे स्टुडिओतील बहुतांश भाग जळाला होता. तसेच चेंबूर लांब असल्याने अंधेरी किंवा गोरेगाव येथेच शुटिंगसाठी जागा निवडण्यात येत आहे. 

Web Title: The Iconic RK Studio Built By Raj Kapoor Is Now Up For Sale