'तेच मुस्लिम म्हणाला तर तुम्ही देशद्रोही ठरवाल', ओवैसींची कंगना वादावर प्रतिक्रिया | Asaduddin Owaisi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना -ओवैसी

कंगनाच्या जागी कोणी मुस्लिम असतं तर त्याला देशद्रोही ठरवलं असतं- ओवैसी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangna ranaut) वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. चहू बाजुंनी तिच्यावर टीका सुरु आहे. कंगनाचा पद्म श्री पुरस्कार परत काढून घ्या, तिच्यावर कारवाई करा अशी मागणी होत आहे. कंगनाच्या टीकाकारांमध्ये आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा सुद्धा समावेश झाला आहे. भारताला सन १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र भीक होतं, या कंगनाच्या वक्तव्याचा असदुद्दीन ओवैसी यांनी समाचार घेतला आहे.

"मोहतरमा म्हणजेच कंगनाला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. त्यानंतर मुलाखतीमध्ये भारताला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाल्याचं तिने म्हटलं. जे कंगना म्हणाली, तेच कोणी मुस्लिम म्हणाला असता, तर तुम्ही त्याच्यावर UAPA लावला असता. त्याला तुरुंगात पाठवलं असतं" असे ओवैसी म्हणाले. अलिगडमधील ओवैसी यांच्या भाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावर्षी "२०१४ मध्ये भारताला खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य मिळालं. १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं" असं विधान कंगनाने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलं होतं. "कंगना जे म्हणाली, तेच एक मुस्लिम म्हणाला असता, तर तुम्ही त्याला देशद्रोही ठरवलं असतं. ती क्वीन आहे आणि तुम्ही किंग" असे ओवैसी म्हणाले.

हेही वाचा: महिलेने रिक्षा चालकाला दिली कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या कारण...

"भारत-पाकिस्तान सामन्यावर कोणी वक्तव्य केलं, तर बाबांनी त्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम लावण्याची आणि तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली" असे ओवैसी म्हणाले. त्यांचा रोख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे होता. पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांना योगी आदित्यनाथांनी इशारा दिला होता. "कंगना रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार? की देशद्रोह फक्त मुस्लिमांसाठी आहे" असा सवाल ओवैसींनी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदींना विचारला.

loading image
go to top