भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत 'या' दोघांची नावे आघाडीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मे 2019

अमित शहा यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपला मोठे यश मिळालेले आहे. केंद्रात पुन्हा एकदा सरकार बनविण्यात त्यांना यश आलेले आहे. देशभरातील अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी 30 मे रोजी निश्चित झाला असून, मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहांची वर्णी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता रिक्त होणाऱ्या भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपचे दोन प्रमुख नेते आहेत.

शहा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री किंवा अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. शहा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे आता या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. पण, यामध्ये जे. पी. नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे आघाडीवर आहेत. भाजप एक व्यक्ती-एक पद या सिद्धांतावर काम करत असल्याने शहा यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्याकडे अध्यक्षपद नसणार हे निश्चित आहे.

अमित शहा यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपला मोठे यश मिळालेले आहे. केंद्रात पुन्हा एकदा सरकार बनविण्यात त्यांना यश आलेले आहे. देशभरातील अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. शहा हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगरमधून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if Amit Shah gets ministry in Modi cabinet so JP Nadda or Dharmendra Pradhan may be elected as new bjp president