Video : मोदीजी, तुम्ही मतदान का नाही केले? - ममता बॅनर्जी

वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचाही नागरिकत्व कायद्याला विरोध दिसत असल्याचे म्हटले आहे. नागरिकत्व विधेयक जर एवढे चांगले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकाच्या बाजूने का मतदान केले नाही असा प्रश्नही ममतांनी  केला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचाही नागरिकत्व कायद्याला विरोध दिसत असल्याचे म्हटले आहे. नागरिकत्व विधेयक जर एवढे चांगले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकाच्या बाजूने का मतदान केले नाही असा प्रश्नही ममतांनी  केला आहे. पंतप्रधान महोदय तुम्ही दोन दिवस संसदेत होता, परंतु आपण विधेयकाच्या बाजूने मतदान नाही केले. याचा अर्थ तुम्ही या विधेयकाला समर्थन करत नाहीत तर हा कायदा रद्द करा, असेही ममता यांनी म्हटले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, नागरिकत्व कायद्यावरून देशभर जनक्षोभ उसळला असताना ममता यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याची मागणी केल्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. खुद्द पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनीच ममतांच्या विधानाशी असहमती दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. 

ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

तसेच, या मुद्द्यावरून ममतांनी काहीशी मवाळ भूमिका घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) रद्द केली जावी अशी मागणी केली आहे. हा कुणाच्याही जय अथवा पराजयाचा मुद्दा नसून सरकारने या दोन्ही बाबी रद्द करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If CAB is so good why didnt you vote? Mamata questions PM Modi