IFFI : "कन्टेंट दमदार असेल तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठही गाजवाल"; अनुराग ठाकूरांचा फिल्ममेकर्सना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Thakur_IFFI

IFFI : "कन्टेंट दमदार असेल तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठही गाजवाल"; अनुराग ठाकूरांचा फिल्ममेकर्सना सल्ला

पणजी (गोवा) : प्रादेशिक सिनेमा भारतात आता प्रादेशिक राहिलेला नाही. कारण हा सिनेमा आता आपल्या सीमा ओलांडून देशातच नव्हे तर परदेशातही आपला डंका गाजवतोय, अशी भूमिका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडली. गोव्यातील पणजी इथं सुरु असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार'च्या उद्घाटनावेळी बोलत होते.

ठाकूर म्हणाले, "आता काहीही प्रादेशिक राहिलेलं नाही. जर आशयात सामर्थ्य असेल तर प्रादेशिक सिनेमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय होऊ शकतात. स्थानिकांमध्ये जागतिक स्तरावर जाण्याची क्षमता आहे. इफ्फीमध्ये चित्रपटांसाठी सह-निर्माते आणि सहकारी शोधण्याच्या भरपूर संधी असतील, यासाठीच हा प्रयत्न आहे. 'फिल्म बाजार' हे दक्षिण आशियाई, आंतरराष्ट्रीय आणि चित्रपट समुदाय यांच्यातील सहकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेले आणि आयोजित केलेले व्यासपीठ आहे"

हेही वाचा: Nasa's Orion capsule : कामगिरी फत्ते! नासाची ओरिअन कॅप्सुल पोहोचली चंद्रावर; 50 वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नोंद

दमदार कन्टेंटमध्ये सीमारेषा तोडण्याची शक्ती आहे हे सांगताना ठाकूर म्हणाले, "तरुणांना सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या व्हिजननं सुरू झालेल्या 75 क्रिएटिव्ह माइंड्सनं केवळ हेच अधोरेखित केलंय की, प्रतिभा फक्त शहरांमध्येच नव्हे तर लहान गावांमध्येही आहे. शहरं आणि गावं, जिथं मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. हे लोकांना कमाई करण्यास सक्षम बनवतात. कारण आता हातातला मोबाईल फोनही तुम्हाला स्टार बनवू शकतो. भारतात सर्वत्र दुर्गम खेड्यांची स्वतःची कहाणी आहे जी लोकांशी कनेक्ट होऊ शकते"

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

यंदाच्या फिल्म बाजारात सिनेमॅटिक कंटेंट विकसित करणे, कोविड-नंतरच्या काळात वाढत्या ओटीटीचा प्रभाव, ट्रेड मॅगझिन, पुस्तकापासून बॉक्स ऑफिसपर्यंत दक्षिण आशियाई सामग्री विदेशात वितरित करणे, समकालीनांसाठी क्लासिक सिनेमाचं अर्काईव्ह करणे आणि प्रोग्रामिंग या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.