Nasa's Orion capsule : कामगिरी फत्ते! नासाची ओरिअन कॅप्सुल पोहोचली चंद्रावर; 50 वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

orion satellite

Nasa's Orion capsule : कामगिरी फत्ते! नासाची ओरिअन कॅप्सुल पोहोचली चंद्रावर; 50 वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नोंद

वॉशिंग्टन : नासाची ओरियन कॅप्सूल सोमवारी चंद्रावर पोहोचली. चंद्राच्या मागच्या बाजूने फेरी मारत या कॅप्सूलनं चंद्राच्या कक्षेत विक्रमी 80 मैलांचं अर्थात 128 किमी अंतर कापलं. पृथ्वीपासून 232,000 मैल (375,000 किमी) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या चंद्राच्या मागून कॅप्सूल बाहेर येईपर्यंत ह्यूस्टनमधील फ्लाइट कंट्रोलर्सना अर्ध्या तासांचं कम्युनिकेशन ब्लॅकआउट पहायला मिळालं. पण या काळात कॅप्सूल व्यवस्थित आहे की नाही याबाबत इंजिनिअर्स काळजीत होते. (NASA Orion capsule has reached the moon whipping around the back side)

50 वर्षांपूर्वी नासाच्या 'अपोलो' हे यान चंद्रावर पाठवलं होतं, त्यातून निल आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर आता ओरिअन कॅप्सूलनं चंद्राला भेट दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या बुधवारपासून सुरू झालेल्या 4.1 अब्ज डॉलर खर्च आलेलं हे उड्डाण एक मोठा मैलाचा दगड ठरलं आहे. या कॅप्सूलनं फ्लोरिडाच्या केनेडी या अवकाश प्रक्षेपण केंद्रातून गेल्या बुधवारी ब्लास्टिंग केलं होतं, त्यानंतर काही हजार मैलांवर जाऊन ते बंद करण्यात आलं होतं. त्यावेळी पहाटे घेतलेल्या व्हिडीओत चंद्र खूप मोठा दिसत होता.

हेही वाचा: Gurmeet Ram Rahim: "T20 क्रिकेटची सुरुवात मीच केली"; राम रहिमचा सत्संगमध्ये अजब दावा

पृथ्वीपासून सुमारे 2,50,000 मैल अर्थात 4,00,000 किमी अंतरावर अपोलो 13 यानं सन 1970 मध्ये पोहोचलं होतं. त्याही पुढे जात आता ही ओरियन कॅप्सूल पृथ्वीपासून सुमारे 2,70,000 मैल अर्थात 4,33,000 किमीवर अंतरावर पोहोचली आहे. परत पृथ्वीवर परतण्यापूर्वी ही कॅप्सूल चंद्राच्या कक्षेत जवळपास एक आठवडा घालवणार आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

या कॅप्सूलसाठी 11 डिसेंबर रोजी पॅसिफिक स्प्लॅशडाउनची योजना आहे. यानंतर NASAचा अंतराळवीर SpaceX च्या स्टारशिपसह 2025 मध्ये चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल. पण तोपर्यंत मानवाची ही आणखी एक झेप ऐतिहासिक ठरली आहे.

टॅग्स :global newsmoonNASA