
...तर FM चॅनल्सवर कडक कारवाई होणार, केंद्राकडून निर्देश जारी
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून एफएम रेडियो (FM Radio Channels) चॅनल्ससाठी महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. नव्या निर्देशांनुसार जर एफएम रेडिओवर आक्षेपार्ह (catastrophic) कंटेंट प्रसारित केल्यास आवश्यक ती पावले उचलत सरकारने कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एफएम रेडिओ वाहिन्यांना अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित न करण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सप्ष्ट केले आहे. अशा प्रकारचे साहित्य प्रसारित करणे हे 'ग्रँट ऑफ परमिशन अॅग्रीमेंट' (GOPA) चे उल्लंघन असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. (Ministry of Information & Broadcasting On Radio Channels)
अनेक एफएम रेडिओ चॅनेलवर अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जाते असल्याचे मत मंत्रालयाने व्यक्त केले होते. त्याशिवाय अनेक एफएम चॅनल्सवर अनेकदा अश्लील आणि आपत्तीजनक मजकूर प्रसारित केला जात असल्याचीही बाब निर्दशनास अल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला म्हटले आहे. याशिवाय अनेकदा रेडिओ जॉकीकडून (Radio Jockey) वापरण्यात येणारी भाषा अशोभनीय, दुहेरी अर्थपूर्ण आणि आक्षेपार्ह असल्याचेही आढळून आल्याचे मंत्रालयाने आहे.
तर होणार कारवाई
रेडियो चॅनल्सवर प्रसारित होणारी कोणतीही सामग्री, संदेश, जाहिरात किंवा संदेश आक्षेपार्ह, अश्लील अथवा असंगत नसावा असे सांगत जे या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.