डॉक्टरांनीच कोरोना पसरवला, भिडे गुरूजी पुन्हा बरसले

यापूर्वी भिडे यांनी केलेल्या विविध वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाले आहेत.
Sambhaji-Bhide
Sambhaji-BhideSakal

अमरावती : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी भिडे यांनी कोण्या राजकीय व्यक्तीविरोधात नव्हे तर, रूग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांवर (Doctor) वादग्रस्त वक्तव्य केले असून, कोरोनाची भीती डॉक्टरांनी पसरवल्याचे वक्तव्य करत भिडे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. यापूर्वी भिडे यांनी केलेल्या विविध वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाले आहेत. त्यात आता भिडे यांनी डॉक्टरांवरच निशाणा साधल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यत आहे. ते अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांबद्दल वरील विधान केले असून, यावेळी त्यांनी काही अपशब्द देखील वापरले आहेत. (Sambhaji Bhide Controversial Statement On Doctor )

Sambhaji-Bhide
युक्रेनमधील भारतीयांसाठी वायुसेनाही मैदानात; मोदींच्या सूचना

भाषणादरम्यान मास्क घालून बसलेल्या एका व्यक्तीला पाहून भिडे यांनी, तोंडावरचा मास्क काढ असे म्हणत काही अपशब्द उच्चारत मास्क लावणं गां* पणाचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर नालायक असून लुटारू असल्याचे सांगत, डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे असून, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका अशा आशयाचे वक्तव्य भिडे यांनी डॉक्टरांवर बोलताना केले आहे.

Sambhaji-Bhide
पुण्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा; या गोष्टीसाठी मिळाला मान

ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या लोकांना कोरोना होतो

काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी कोरोना (Corona) हा काल्पनिक असून तो ना स्त्री ना पुरुष, अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. असं वक्तव्य केले होते. शिवाय कोरोना थोतांड असून चीनने (China) तुम्हा-आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असं भिडे म्हणाले होते. त्यांचा या वक्तव्याचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता. याशिवाय मागील वर्षी कोरोनाची दुसऱ्या लाटेवेळी संभाजी भिडेंनी कोरोनामुळे मरणारी माणसे जगायच्या लायकीची नाहीत असे वक्तव्य केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com